पाप-पुण्य, नीती-अनीती या संकल्पना माणसाने केवळ माणुसकीने वागावं, दुर्बळ मनुष्यालाही बऱ्यापैकी जगता यावं, सबलांकडून त्यांचे शोषण होऊ नये यासाठी तयार केलेल्या आहेत.
प्रत्यक्षात करावे तसे भरावे ही बाळबोध संकल्पना आहे. जंगलातला सिंह हरणाला मारून खातो, म्हणून त्याला कुणी मारून खात नाही, किंवा या पापामुळे तो हाल हाल होऊन मरतो असलं काही घडत नाही. कारण सिंहाला गिल्ट नसतो.
माणसाला त्याचा गिल्ट मारतो. कुरतडतो. आणि तो खंगून मरतो. दोन हजार माणसांना मारूनही, किंवा दरोडा घालूनही गिल्ट नसेल, तर त्या व्यक्तीला असल्या कोणत्याही संकल्पनांमुळे वाईट आयुष्य किंवा वाईट मरण येत नसतं. वाल्या कोळ्यालाही त्या वाटसरूने गिल्ट दिला. पापाचा. म्हणून त्याने चोरी सोडली. अन्यथा काही कारण नव्हते. (तो चोरच राहिला असता, तर बरं होतं. हे रामायण आपल्या माथी मारले गेले नसते.ते वेगळं.😄)
अनेक गुन्हेगार लोक पापभीरू माणसाहून चांगले आयुष्य जगत असतात. (आणि त्यांचं चांगलं आयुष्य पाहून इतर जळत असतात, चीडत असतात😂
हा गिल्ट आणण्याचं काम धार्मिक कल्पना करतात. पाप-पुण्य, नीती-अनीती, स्वर्ग-नरक इत्यादी. आणि शेकडा नव्वद टक्के तरी लोक त्याला बळी पडून माणुसकीने वागण्याचा प्रयत्न करतात.
लोक भिकाऱ्याला भीक देतात, संस्थांना दान देतात तेही या गिल्टमधूनच. आपण पैसा कमवलाय म्हणजे काहीतरी वाईट केलंय, आणि याला त्यातला काही वाटा दिला नाही, तर उद्या त्याची हाय लागून आपल्यावरही याच्यासारखी पाळी येईल हा गिल्ट माणसाला घाबरवतो. आणि तो शेअरींग करू लागतो. करुणा वगैरे भावना देखील संताबिंतांनी प्रवचनांतून सातत्याने जागृत केलेल्या भावना आहेत. त्या उपजतच सगळ्यांमध्ये असतात असं नाही.
ही भावना इतकी प्रबळ आहे, की माझ्या ओळखीत काही लोक असे आहेत, जे सर्रास काळा पैसा कमवतात आणि अमुक इतकं दान केलं की पाप राहात नाही असं मानतात.😆😆इतके पापभीरू लोक असल्यामुळेच माणसातल्या दुर्बल जमातीही टिकून राहतात.
मार्क्सवाद हा अतिरेकी धर्म आहे. तो सिंहालाही उंदीर करू पाहतो. कारण उंदरांना नीट जगता यावं. तो उंदराला सिंह बनवत नाही. कारण ते शक्य नसतं. सिंहाला गिल्ट देऊन उंदीर करता येईल. उंदराला सिंह कसं बनवणार?
हाच गिल्ट स्त्रियांना दिला जातो. प्रत्यक्षात देहविक्रय करणाऱ्या (वेश्याच नव्हे, तर मॉडेल्स, अभिनेत्री इत्यादी हाय प्रोफाईल स्त्रिया, ज्या आपल्या दैहीक माध्यमातूनच पैसा कमवतात.) अशा हाय प्रोफाईल स्त्रिया अधिक स्वतंत्र, अधिक चांगले आयुष्य जगत असतात. जगू शकतात. परंतु इतर (वड पुजणाऱ्या) स्त्रियांना त्याचा गिल्ट देण्यात येतो. पावित्र्य-चारित्र्य इत्यादी. आणि त्या हाच गिल्ट आयुष्यभर बाळगून दैहीक एकनिष्ठता, योनिशुचिता, पडदा इत्यादीलाच चारित्र्य मानून मन मारून जगत असतात. कारण यात पितृप्रधान समाजाचा स्वार्थ असतो.
एकपत्नी वा एकपती हा नियम देखील खोल विचार करता, समाजातील प्रत्येकाला किमान एकतरी जोडीदार मिळावा यासाठीच केलेला दिसेल. अन्यथा जे बलवान पुरुष असतील (सत्ता, संपत्ती, बळ इत्यादी सर्व असलेले) तेच अधिकाधिक बायका मिळवतील आणि समाजातील दुर्बळ पुरुष लग्नाविना (किंवा जोडीदाराविना) राहून जातील. व्हाईस वर्सा ज्या सुंदर, उपजाऊ, स्त्रिया असतील, त्यांनाच अधिक आणि चांगले पुरुष मिळतील आणि बाकीच्या राहून जातील. पण हा नियम देखील पूर्वी चारित्र्याच्या नावावर तर आता कायद्याच्या जोरावर गिल्ट देऊनच अधिक राबवला जातो.
हा गिल्ट दुधारी शस्त्र आहे. तो योग्य प्रमाणात असेल, तर त्यातून माणूस घडतो. अती झाला तर खंगतो, मन मारून अनैसर्गिक जगतो आणि अजिबात नसला, तर तो माणूसकीला, मानवी समाजाला घातक ठरतो.
मानवी समाजात पुरुषापेक्षा स्त्रियांना अधिक गिल्ट देण्यात येतात. सर्व सामान्य पुरुषाला दिलेले गिल्ट तर यात येतातच. शिवाय स्त्री असल्याचे अनेक इतर गिल्टही हेतूपुरस्सर देऊन ठेवलेले असतात.
-अलका गांधी-असेरकर
खरं आहे. समाजात व्यवस्था राहावी ह्या हेतूनी बरेचसे अशे गिल्ट देऊन ठेवण्यात आलेले आहेत. जरी हेतू चांगला असला तरी पर्यायानी individual freedom चा गळा दाबला गेलेला आहे; विशेष करून स्त्रियांना मोठा प्रमाणत अन्याय झालेला आहे.
ReplyDeleteया इथेही पुरुषांना तुम्ही सत्ता संपत्ती बळ दिले. आणि आणि स्त्रियांना सौंदर्य व उपजाऊपणा दिलाय. या उलटही होऊ शकले असते. असो. निर्बल पुरुषांसाठी कुरूप स्त्रिया उरल्यास असत्या आणि कुरुप स्त्रियांसाठी निर्धन पुरुष. निसर्गाने आपले काम केलेच असते. शिवाय बलवान,सत्ताधारी पुरुषांकडे सुंदर स्त्रिया गेल्या असत्या तरी त्यांच्या मुलांमध्ये सत्ता आणि संपत्तीच्या वारश्यासाठी संघर्ष आणि आपसी युद्ध झालेच असते. तसाही सामाजिक विनाश झालाच असता.

ReplyDelete