सर्व साधारणपणे हॉस्पिटलात असे रेट असतात. बोर्ड वर लिहूनच ठेवलेले असतात.
नर्स चार्जेस दर दिवशी 2000
Rmo dr 2000
Mavshi /mama 500
विशेष dr visit फी 3000
लॅब रोज 3000 हजार
Oxygen 2000
Bp unit 1000
रूम चार्जेस २-३००० ( एवढे तर चांगल्या हॉटेलचे पण नसतात अनेकदा)
असो
प्रश्न हा आहे की ह्या रेट प्रमाणे तिथल्या नर्सला, वॉर्ड बॉयला, RMOला पगार मिळतात का??
Dr ना शिकताना, नंतर हॉस्पिटल्स उभारायला खर्च येतात. मान्य आहे. म्हणून आयुष्यभर त्यांनी खोऱ्याने पैसे कमवावे असा काही नियम आहे का..??
वरील रेटने सर्व सामान्य माणसाला उत्पन्न कमवायला अख्खा आयुष्य जातं,
तर ते आयुष्य भर कमावलेलं गमवायला एक आजार अन एक Dr आणि त्याचे हॉस्पिटल पुरेसे असतात . माणसाची आयुष्य भराची पुंजी dr. Hospitals आणि औषध कंपन्या अलगद त्याच्या खिशातून केवळ एक दोन महिन्यात बिन बोभाट काढून घेऊ शकतात .. काढतात.
आणि त्या माणसाची पूंजी संपली की तो बरा होवो वां ना होवो, त्याला दवाखान्यातून हाकलून देतात.
No comments:
Post a Comment