खूपदा बातम्या वाचण्यात येतात. 'लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार' 'लग्नाचे आमिष दाखवून नऊ वर्षे बलात्कार'. तेव्हा ती बातमी फारच विनोदी वाटते. हो, अगदी मलाही.
शिवाय अजून विनोद तर पुढेच आहे. अनेकदा या बातम्यांतील स्त्रियांचे वय तिशीच्या पुढे असते. पस्तीस, चाळीस, पंचेचाळीस ते अगदी पन्नासही.
हा तर कळसच झाला अध्यायाचा.
एकवेळ अज्ञान, (वयाने आणि शिक्षणानेही) मुलींच्या बाबतीत असं काही घडत असेल तर ते गांभीर्याने घेताही येईल.

पण तिशी उलटल्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार कसा काय होऊ शकतो?
पुन्हा कहर म्हणजे यातल्या स्वतःला व्हिक्टिम समजणाऱ्या स्त्रिया या अनेकदा डिव्होर्सी, विधवा, एकट्या राहणाऱ्या, मुलं असलेल्या, नवऱ्याशी न पटलेल्या अशाही असतात. म्हणजे जीवनाचा बऱ्यापैकी अनुभव घेतलेल्याही असतात. त्या जेव्हा एखादा पुरुष आपल्याशी लग्न करेल या आशेवर त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवत असतील आणि तो पुरुष निघून गेल्यावर, वा त्याच्याशी न पटल्यावर त्याच्यावर 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' हा आरोप लावत असतील तर कठीण आहे. मुळात असा आरोप कोर्टात टिकतो? ह्याबद्दल उत्सुकता आहे.
त्यातही 'लग्नाचं आमिष दाखवून अमुक वर्षे लैंगिक संबंध ठेवले' असा शब्दप्रयोग जरा तरी समजू शकतो. मात्र लग्नाचं आमिष दाखवून 'बलात्कार' कसा काय असू शकतो बुवा? बलात्कार हा बलात्कार असतो. त्यात कुठलंही आमिष कसं काय असू शकतं (वयाने अज्ञान मुलगी सोडल्यास)

वचन लग्नाचं असो वा सोबत राहण्याचं असो. हे जर काही मागणीवर आधारित असेल, तर तेव्हाच शंका यायला हवी. आणि तशी आली नसेल, तर असे संबंध त्या स्त्रीलाही तितकेच हवेहवेसे वाटले असणार. त्याशिवाय ती त्यात सहभागी होणार नाही. वयाची चाळीशी आली, तरी मानवी स्वभाव, त्यातही पुरुषी स्वभाव, वृत्ती ओळखता येत नसेल, तर आपल्यातच काहीतरी अज्ञान आहे अजूनही. आणि त्याला कारणीभूत आपण आणि आपला समाज आहे.
त्याही पल्याड, या बातमीत अजून एक असे अधोरेखित होते, की जणू लैंगिक संबंध हे पुरुषालाच हवेसे वाटतात. त्यालाच त्याची गरज असते आणि स्त्री केवळ त्याला साधन म्हणून आपला देह त्याला सोपवते. तसा ती सोपवतही असते अनेकदा. पण तेही तिच्या इच्छेवर, प्रेमावर, समंजसपणावर ती सोपवत असते. जबरीने नाही. जबरी आली तर बलात्कार आला हे मान्यच. पण प्रत्यक्षात असे नसते. जी स्त्री अमुक इतकी वर्षे लग्नाच्या आमिषावर एखाद्याशी असे संबंध ठेवते तेव्हा तिनेही त्याच्या इतकाच आनंद त्याच्याबरोबर घेतलेला असतो. त्या त्या क्षणाला तो बलात्कार नसतोच.
शिवाय यामुळे अजूनही असा एक गैरसमज पसरतो की लैंगिक संबंधात केवळ पुरुषच त्या स्त्रीचा उपभोग घेत असतो. आणि स्त्री मात्र बिचारी, उपभोगाचे साधन म्हणून वापरली जात असते. हा समज समाजात बऱ्यापैकी अजूनही दाट आहे. अनेकदा प्रेमात विशेषतः भारतीय मुलींना सावध केले जाते ते अशा शब्दांत, 'तो तुला वापरून फेकून देईल. सोडून देईल.' यातूनच स्त्रियांच्या मनातही हा समज घर करून असतो की लैंगिक संबंधात आपला 'वापर' केला जातो. आणि पुरुष हा केवळ उपभोगकर्ता असतो. असा समजच मनात किंवा डोक्यात असणं हे अतिशय वाईट आहे. असे संबंध हे एकाच वेळी दोघांनाही सारखाच आनंद देणारे असतात. त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणावे (गरोदरपणा, त्याच्यापासून आजार वगैरे) तर त्यालाही जबाबदार आपला निष्काळजीपणा असतो.

एकेकाळी वैज्ञानिक साधने उपलब्ध नसताना हे समजू शकतो की अशा संबंधांत स्त्रिया अधिक सफर होत होत्या. पण आता विज्ञान मदतीला असताना असं काही राहिलेलं नाही. तेव्हा असा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. या बाबतीत तरी मी कोणत्याही प्रौढ बाईची तरी बाजू घेणार नाही.
आणि अजूनही स्त्रिया या बाबतीत अज्ञानी, भोळ्या, निरागस किंवा सरळ मूर्ख म्हणू या, राहत असतील तर त्याला जबाबदार सर्वस्वी त्या स्वतः आहेत. एक तर माणूस ओळखायला शिका, किंवा माणूस ओळखूनही त्याच्याशी संबंध ठेवायचे असतील, तर त्याच्याप्रमाणेच आपला स्वार्थ साधायला शिका.
थोडंसं हे मान्य आहे, की अशा संबंधात स्त्रियांची, मुलींची बदनामी अधिक होते. तिच्या चारित्र्याच्या नावाने डंका अधिक पिटला जातो. आणि पुरुष नेहमी नामानिराळा राहतो. त्याला फार बदनाम केले जात नाही. हे अगदीच मान्य आहे. पण या चारित्र्य नावाच्या बुजगावण्याला किती भीक घालायची हे आता स्त्रियांनी स्वतःच ठरवायची वेळ आलीय. घाबरलात तर तो भीतीदायक वाटेल, आणि फाट्यावर मारलंत तर ते बुजगावणं आहे हे सिद्ध होईल.

मात्र अशी प्रकरणे घेऊन स्त्रिया कोर्टापर्यंत जात असतील, तर त्यांना तशी चारित्र्याचीही भीती वाटत असेल असं वाटत नाही. त्या पुरुषाला धडा शिकवण्यासाठीच हे पाऊल त्यांच्याकडून उचललं जातं आणि स्त्री असल्याचं व्हिक्टीम कार्ड खेळलं जातं अनेकदा.
काही वृत्ती या स्त्री आणि पुरुषांच्या नैसर्गिक आहेत. कदाचित नैसर्गिक नसल्या तरी त्या सामाजिकीकरणात का होईना, तशा घडलेल्या आहेत, आणि त्या ओळखता आल्या पाहिजेत. आणि मगच पुढचं पाऊल उचलायचं की नाही ते ठरवता यायला पाहिजे.

पुरुषांनीही असे संबंध प्रस्थापित करताना लक्षात घ्यायला हवं, की असे संबंध जोडताना स्त्रिया लॉंग रिलेशनशीपची अपेक्षा ठेवतात. त्यांच्यासाठी हे नातं फक्त शारीरिक राहात नाही. ते भावनिकही बनतं. त्यामुळे नात्यात स्पष्टता ठेवा. आपण कितपत आणि किती साथ देऊ शकणार आहोत ते क्लिअर करा सुरुवातीलाच. खोटी आमिषं, जी पूर्ण करता येणार नाहीत अशी दाखवू नका.
थोडक्यात, मैत्री करा, प्रेमात पडा, लैंगिक संंबंध ठेवा. आनंद घ्या, द्या. मात्र परिस्थिती फिरली की व्हिक्टीम कार्ड खेळून स्वतःला आणि समोरच्यालाही त्रास देऊ नये असं वाटतं. नातं काचायला लागलं की सोडूनही देता यायला हवं. पुढचं वळण धरायला हवं. अगदी स्त्रियांनाही ते जमायला हवं... सोपं नाही. पण जमवायचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. पुरुषापेक्षा स्त्रिया भावनिकरित्या अधिक गुंततात त्यामुळे त्यांना ते जड जातं. पण मैत्रिणींनो, आपल्याला जमायला हवं ते.
- अलका गांधी-असेरकर