तो डान्स करतो तेव्हा निव्वळ मोहक दिसतो
बाथरूम मध्ये मोठ मोठ्याने गातो तेव्हा सेक्सी वाटतो
तो सैपाक करत असतो
तेव्हा सुंदर दिसतो
भाजी चिरताना लाजवाब दिसतो
तो मुलाला आंघोळ घालत असतो तेव्हा निर्मळ दिसतो
मुलीच्या केसांना रिबिनी बांधून देताना प्रेमळ दिसतो
तो घर आवरताना जबाबदार असतो
दुरुस्तीची कामे चटकन करताना जादूगार वाटतो
तो खेळताना कमाल असतो
आणि रडताना निष्पाप दिसतो
त्याचं घरात असणंही आश्वासक असतं
तो बाहेर असला की घर वाट पहात असतं
पुरुष आक्रमक होऊन
तलवार हातात घेऊन
फक्त लढताना मर्द असतो ही भ्रामक कल्पना आहे...
नि तो फक्त पैसे कमवणारा
भारवाही हमाल असतो ही बिचाऱ्यावर
लादलेली संकल्पना आहे....
त्याच्यावर मर्दपणा लादला नाही,
तर तो खरंच मर्द असतो........
- अलका गांधी-असेरकरwedding dance
कविता खूप भावली... जास्तीत जास्त पुरुषांपर्यंत पोहचायला हवी ! धन्यवाद इतक्या सहज नि सोप्या शब्दांत व्यक्त झाल्याबद्दल !!
ReplyDeleteसोबतचे नृत्य देखील अप्रतिम दृश्यानुभव देणारं...मनमोहक पदन्यास..खूप प्रेक्षणीय !
ReplyDelete